पुणे २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे, पुणे ते सोलापूर महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने उरुळी कांचन येथे भीषण असा अपघात झाला आहे, दरम्यान हा अपघात झाल्यानंतर सदरचा अपघातग्रस्त ट्रक हा रस्त्याच्या मधोमध आडवा झाला आहे, त्यामुळे सकाळीच या महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, दरम्यान ५ किलो मीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत दरम्यान या अपघाताबाबत पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार येथील तळवडी चौकामधून एक कंटेनर शिंदवणे रोडकडे वळत असताना सोलापूर बाजूकडून येणाऱ्या ट्रकने कंटेनरला जोरात धडक दिली यामुळे झालेल्या अपघातात ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला आहे, दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.