पुणे २१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथून आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुणे शहरातील पुणे रेल्वे स्टेशन, तसेच भोसरी येथे एका ठिकाणी तसेच नव चैतन्य महिला मंडळ इत्यादी ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याचा एक काॅल ११२ कंट्रोल रूमला सोमवारी १९ मे रोजी अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिल्यानंतर पुणे 👮 पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत, पुण्यात सर्व ठिकाणी पोलिसांचा तपास सुरू आहे,
दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने दिलेल्या धमकी नंतर पोलिसांनी 👮 तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहे.पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या अधिकारी व सीआरपीएफचे रेल्वे पोलिस तसेच पुणे पोलिसांची पथके एकत्रितपणे तपास करत आहेत. दरम्यान पुण्यातील संदिग्ध भागात शोध मोहीम सुरू केली आहे.मात्र शोध मोहीम मध्ये कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू मिळून आली नाही, दरम्यान आता पुणे पोलिस संबंधित व्यक्तीने ११२ आपात्कालीन फोनवर देण्यात आलेली माहिती खरी की खोटी यांचा तपास करीत आहेत,तसेच काॅल करणा-या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्य माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवता शांतता राखावी,असे आवाहन पुणे पोलिसांनी 👮 केले आहे.