पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक अपडेट ही जम्मू काश्मीर येथून आली आहे.जम्मू काश्मीर येथील किश्तवाडमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान किश्तवाडमध्ये एका घनदाट जंगलात काही दहशतवादी हे लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी या परिसराला संपूर्ण वेढा दिला आहे.व शोधमोहीम सुरू असताना किश्तवाडमधील चतरु भागातील सिंहपोरा येथे लपलेल्या ३ ते ४ दहशतवाद्यी व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे.दरम्यान सुरक्षा दल व लष्कर यांच्या संयुक्त कारवाई सुरू आहे.घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.दरम्यान मंगळवारी या भागात दहशतवाद्यांना मदत करणा-यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.