पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी शतक पार झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली आहे,तसेच कोरोना व्हायरसने नागरिकांची आणि आरोग्य विभागाची झोप उडवली आहे, दरम्यान रुग्ण संख्यात झपाट्याने वाढ होत आहे, देशभरात आता पर्यंत २५७ लोक बाधित झाले आहेत,तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांने शतक पार पडले आहे, दरम्यान सध्या महाराष्ट्रात १०३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत, तर फक्त एकट्या मुंबईत ९५ रुग्ण आढळून आले आहेत, यावेळी कोविड JN1चा नवीन व्हेरिएंट आला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी,असे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे,
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शतकपार गेली आहे, त्यामुळे घरातील स्वच्छतेसाठी ‘फुड सेफ्टी अॅन्ड स्टॅण्डर्ड ऑथोरिटी इंडिया ‘ यांनी स्वच्छतेसाठी काही नियम सांगितले आहेत, दरम्यान स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा, गॅस शेगडी,अगदी स्वच्छ पुसून घ्यावे, तसेच संध्याकाळी देखील शेगडीची स्वच्छता करा, तसेच मंडई मधून भाजीपाला आणल्या नंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा,व नंतरच फ्रिजमध्ये ठेवावा तसेच पदार्थांची पाकिटे स्वच्छ धुवून घ्यावीत, नंतर हात ✋ देखील साबणाने स्वच्छ धुवावेत,