पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून अपडेट आली असून दोन कोटी रुपयांची मागणी करुन छळ करुन तसेच मारहाण करण्यात आलेल्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती.तिचे बाळ हे हागवणे कुटुंबांचे नातेवाईक यांच्याकडे आहे.दरम्यान वैष्णवीचे बाळ आमच्याकडं द्यावे,अशी मागणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे.व वैष्णवीचे बाळ तिचे वडील अनिल कस्पटे यांच्याकडे तातडीने द्यावे.असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी रुपाली पाटील व नागवडे ह्या हे बाळ कस्पटे कुटुंबाकडे आज देणार आहे.