पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे.दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणांशी माझा दुरान्वये संबंध नाही असे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे, दरम्यान वैष्णवी हिने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मदत करतात व त्यांचा पाठिंबा आहे,असा खळबळजनक दावा कस्पटे कुटुंबाच्या वतीने करण्यात आला होता,त्या नंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावर सविस्तर माहिती मी पत्रकार परिषद मध्ये देईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.दरम्यान वैष्णवी हिच्या आत्महत्या नंतर सहाव्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले आहे.