पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड येथून आली आहे.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या तक्रारी होत्या, मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर केज पोलिसांनी 👮 गावकऱ्यांची तक्रार घेतली नाही.उलटपक्षी यातील आरोपींना पोलिसांनी मदत केली,याचा पडदाफाश झाल्यानंतर तसेच पोलिसांनी यावेळी अपहरण बाबत पोलिसांनी तक्रार घेतली असती तर सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला नसता,असा गंभीर आरोप देशमुख कुटुंबीय व गावकऱ्यांनी केला होता,
दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर या सर्व पोलिसांच्या नाकर्तेपणावर संपूर्ण महाराष्ट्रात एकच वादळ उठलं होतं.त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने यात लक्ष घालून यातील पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती, त्यांच्या बदल्या तातडीने दुसरी कडे करण्यात आल्या आहेत,यात बीड जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सरकारकडे केली होती, त्यानंतर आता महायुती सरकारने अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ६०० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी देखील याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.आता या महिन्यात सर्व कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होतील, दरम्यान संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले होते, यातील काही पोलिस तेथील काही स्थानिक गुंडाबरोबर संबंध होते, त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते, तसेच गुन्हेगारांची हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढली होती, आता बीड जिल्ह्यातील एकूण ६०० पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान बीडची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली होती.माध्यमांनी देखील यावर वेळोवेळी या सर्व बाबत न्यूज दिल्या होत्या, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला होता, आतातरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करुया,