पुणे २२ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे.अमेरिकेत इस्त्रायली दूतावासातील दोन अधिकारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, दरम्यान सूत्रांकडून याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वाॅशिंग्टनमधील ज्यू संग्रहालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दूतावासातील कर्मचारी पोहोचले असताना हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान हा हल्ला यहूदी -विरोधी दहशतवाद्यांनी केल्याचा दावा इस्त्रायली अधिकारी यांनी केला आहे. दरम्यान आता या हल्ल्याची चौकशी सुरू असून गुन्हेगांराना लवकरच पकडले जाईल,असे अमेरिकाचे गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी यांनी म्हटले आहे,