पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील दौंड व बारामती तालुक्यात मुसाळधार पाऊस पडला आहे,तर पुणे ते सोलापूर महामार्गावर पाटस येथे ☁️ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच बारामती मध्ये देखील मुसाळधार पाऊस झाला आहे.त्यामुळे डावा निराश कालवा फुटला आहे.व कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व घरात घुसले आहे.तर दौंड तालुक्यात देखील मुसाळधार पाऊस झाला आहे.त्यामुळे स्वामी चिंचोली येथील १० घरे पाण्याखाली गेली आहेत.दरम्यान दौंड व बारामती येथे NDRFची टीम रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान आज रविवारी दौंड व बारामतीत मुसाळधार पाऊस झाला आहे.तसेच पाटस येथे ☁️ देखील ढगफुटी सदृश्य पावसामुळे सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.तर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे १० घरे पाण्याखाली गेली आहेत.दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी चालविण्यात आलं आहे.तर मुसाळधार पावसामुळे बारामती येथील नीरा डावा कालवा फुटला आहे.व त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व घरात गेले आहे.दौंड तालुक्या मधील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे.पाण्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे तातडीने बारामतीकडे रवाना होत आहे.दरम्यान दौंड व बारामती येथील नागरिकांनी काम असेल तरच घरा बाहेर पडावे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती दिली आहे की दौंड व बारामती तालुक्यात NDRFच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.तसेच दोन्ही तालुक्यातील आपात्कालीन व्यवस्थेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान ज्या गावात नागरिक पावसामुळे अडकले आहेत त्यांना NDRF चे जवान बाहेर काढणार आहेत, दरम्यान पुणे ते सोलापूर महामार्गावर देखील पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.व वाहनांच्या देखील मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्या आहेत.मुसाळधार पावसामुळे बारामती येथील तीन इमारती ह्या खचल्या आहेत.