पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याने पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे,कार चालक , रिक्षा चालक व दुचाकी चालक यांना अक्षरशः रोजच ता-यावरची कसरत करावी लागत आहे, तसेच रस्त्यावरून चालताना वृद्ध नागरिक तसेच अन्य नागरिकांना रस्त्यावरून चालताना देखील त्रास होत आहे,यातच आता पुण्या मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, पुण्यातील सहकारनगर भागात पुणे महानगरपालिकेच्या वतीने आंबिल ओढ्याची नालेसफाई केली जात होती,पण हा कचरा नाल्यातच पसरविला जात होता,जर पुणे महानगरपालिकेच्या वतीने जर असे काम केले जात असतील तर पुणे मात्र नक्कीच या नाल्यात बुडणार हे मात्र नक्की,आता असा संतप्त सवाल नेटकरी करत आहेत, तसेच पुणे महानगरपालिकेचे या गलथानपणा कामामुळे नाल्यात कचरा की कच-यात नाला असे मात्र झाले आहे,