पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवारी बारामती व दौंड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे,मुसाळधार पावसामुळे पुणे ते सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.तसेच एक इनोवा कार पाण्यात वाहून गेली आहे, दरम्यान सुदैवाने यात कोणतीही प्रकरची जीवीतहानी झालेली नाही,मात्र सर्वच रस्ते जलमय झाले आहेत, वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे, तसेच बारामतीमधील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकी साठी बंद झाला आहे.तसेच दौंड ते अहिल्यानगर महामार्गावर पाणीच पाणी असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.
तसेच आज सोलापूर ते पुणे महामार्गावर पाटास येथे ☁️ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, त्यामुळे या महामार्गावर रस्त्यावरून पाणी वाहत होते,त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे, दरम्यान यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सदर ढगफुटी सदृश्य पावसामुळे याठिकाणी पार्किंग करण्यात आलेली वाहने देखील पाण्यात बुडाली आहेत, तसेच शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे, दरम्यान बारामती येथे देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नीरा कालवा फुटला व त्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले व लोकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे.दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती व दौंड तालुक्यात तसेच इंदापूर तालुक्यात देखील मुसाळधार पाऊस झाला आहे, सर्व रस्ते जलमय झाले आहेत, असून या पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर वाहतूकीला बसला आहे.दौंड ते अहिल्यानगर रोडवर दौंड जवळील पवार पॅलेस जवळील रेल्वेच्या पुला खाली मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे, तसेच मुसाळधार पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले आहे. दरम्यान बारामतीमध्ये पावसाने ४० वर्षांचा विक्रम मोडला आहे, असं म्हटलं जात आहे,