पुणे २५ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे,आता त्यांच्या एक महिला पदाधिकाऱ्यांनी एका महिलेला धमकवल्याची ऑडिट क्लिपही व्हायरल झाली आहे,आता हाच धागा पकडून रोहिणी खडसे व किशोरी पेडणेकर यांनी रुपाली चाकणकर यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे, तसेच महिला आयोगाऐवजी ‘धमकी आयोग ‘ असे नाव ठेवा,असा टोला देखील रोहिणी खडसे यांनी लगावला आहे,
दरम्यान आता आपले महिला आयोगाचे पद जातंय या भीतीनं प्रचंड खळबळ उडाली आहे, त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत,अशी टीका जेष्ठ नेते शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली आहे, त्यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप देखील पोस्ट केली आहे, महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवल्याच्या सुपा-या दिल्या जात आहे, महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही? ,असेही त्या म्हणाल्या आहेत,