पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे, दरम्यान या पावसाने बारामतीत कहर केला आहे, अतिवृष्टी पावसामुळे बारामती मधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.तसेच मुसळधार पावसामुळे बारामतीमधील नीरा-डावा कालवा फुटल्याने याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व घरात घुसले होते.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालच पुण्यातून बारामतीत दाखल झाले आहेत.व आज सोमवारी पहाटेच ते नुकसान भरपाईची पाहाणी करत आहेत.दरम्यान अवकाळी पावसामुळे बारामतीत शेतीचे व घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तसेच या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.दरम्यान काल नीरा कालवा फुटल्याने नंतर तो बंद करण्यात आला तरी रात्री पाणी शहरात येत होते,आज मात्र पाणीपुरवठा बंद झाला आहे.बारामतीत तीन इमारती देखील या पावसामुळे खचल्या आहेत,