पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक वृत्त हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून आले आहे, दरम्यान पुणे शहर व जिल्ह्यात काल रविवार पासुन मुसळधार पाऊस सुरू आहे,या पावसा मुळे दौंड मधील ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळाले ल्या माहितीनुसार दौंड शहरात दौंड नगरपालिका हद्दीतील जुन्या घराची भिंत अचानकपणे कोसळल्याने ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे,
दरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव ताराबाई विश्र्वचंद आहिर (वय ७५ रा.दौंड जि. पुणे) असं आहे, दरम्यान ताराबाई ह्या हाराच्या दुकानात बसल्या होत्या, त्याचवेळी भिंत त्यांच्या अंगावर कोसळली व या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे,