पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुसाळधार पाऊस कोसळत असल्याने झाडाखाली थांबलेल्या ८ मजुरांवर वीज कोसळली आहे,तर सदरची घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मधील गोताळा येथील आहे,या झालेल्या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, यातील जखमींवर अहमदपूर मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, सदरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या १) विक्राम कारले २) रंजनाबाई समुखराव अशी आहेत, दरम्यान हे सर्व शेतमजूर असून सदरच्या घटनेनंतर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे,