पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातील आहे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या महिला कार्यकर्त्या सोनाली गाडे यांच्या विरोधात आज धमकी दिल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे, दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट लिहिल्याने सोनाली गाडे या महिला कार्यकर्त्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार यांच्या गटाच्या संगिता भालेराव यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप आहे, भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात व पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडे रुपाली चाकणकर यांच्या पासून आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे.