पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने या महायुतीच्या सरकारची चांगलीच पोलखोल झाली आहे, दरम्यान आज सोमवारी मुंबईत सकाळपासून मुसाळधार पाऊस कोसळत आहे, तसेच रविवारी देखील मुसाळधार पाऊस झाला आहे.मुंबईत अवकाळी पावसानेच कहर केला आहे.अजून मान्सून पावसाला वेळ आहे. तरी देखील मुंबईची तुंबई झाली आहे, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.यात केंद्र सरकारने बनविलेले महामार्गावर देखील नदी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.दरम्यान मुंबईतील वरळी येथील महामेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे .त्यामेट्रोतही पाणीच पाणी झाले आहे,तर संबंधित महामेट्रोचे फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराना महामेट्रोच्या प्रशासनाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.दरम्यान मेट्रोचे दरवाजा उघडताच प्रवाशांना आपण मेट्रो स्टेशनवर आहे की समुद्रात असा अनुभव आला आहे.कारण मेट्रो स्टेशनवर पाण्याचे तळे साचले होते, सगळीकडेच पाणीच पाणी प्रवाशांना दिसले व त्यातूनच त्यांना जावं लागत होते.त्यामुळे मेट्रो प्रवाशांना बाहेर पडणं देखील मुश्कील झाले होते.दरम्यान मेट्रो स्टेशनचा परिसर समुद्रा सारखा जलमय झालेला होता,याचा प्रचंड त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागला आहे.तर दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईची तुंबई झालेली नाही सर्व काही सुरळीत आहे.आणी व्यवस्थीत आहे.असा अजब व गजब दावा केला आहे. दरम्यान आज मुंबईतील केईएम महापालिका रुग्णालयांत देखील पाणी शिरले आहे.तर संपूर्ण रुग्णालय हे जलमय झाले आहे.याचा त्रास रुग्ण व डॉक्टर तसेच परिचारिका तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना याचा त्रास झालेला आहे.