पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, दरम्यान मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे, मागील ४ ते ५ दिवसांपासून पाऊस पडत आहे दरम्यान रात्री देखील दमदार पाऊस मुंबईत होत होता, त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे,व पाणी साचले आहे, मुंबईतील काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज शहरात ☁️ ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, तसेच आज देखील मुसाळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे,
दरम्यान आज मंगळवारी महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे, आज दिनांक २७ मे रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूर, या जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित केला आहे, या भागात मुसळधार व अतिमुसाळधार पावसाची शक्यता आहे, तसेच रायगड, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे , या व्यतिरिक्त ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर,तसेच गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित केला आहे,