पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी गेवराई येथून अपघाताची अपडेट आली आहे, बीड जिल्ह्यात गेवराई जवळील धुळे ते सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे, सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गढी पुलावर कार डिव्हायडरला धडकून किरकोळ अपघात झाला होता, दरम्यान यावेळी कार काढण्या करीता खाली उतरलेल्या ६ जणांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरात धडक दिल्याने यात सर्वांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान मृत्यू झालेल्या लोकांची नावे १) बाळू आतकरे २) मनोज करांडे ३) कृष्णा जाधव ४) दीपक सरोया५)भागवत परळकर ६) सचिन ननावरे अशी आहेत,