पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी मंत्रीमंडळाची कॅबिनेट ची बैठक झाली त्यात अनेक महत्त्वाच्या निर्णय घेण्यात आले आहेत, शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी आता माफ करण्यात आली आहे, इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवाकर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे, दरम्यान इचलकरंजीला ६५७ कोटी तर जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत रक्कम मिळणार आहे, नागपूर पत्रकार कल्बला देण्यात आलेल्या जमीनीबाबत अटी-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहे,
दरम्यान कृषि पर्यवेक्षक व कृषी सहायक यांच्या पदनामात “उपकृषि अधिकारी व सहाय्यक कृषि अधिकारी” असा बदल करण्यात आला आहे, राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचारी यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे, तसेच आशियाई विकास बँक (ADB)सहाय्यिता “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” या संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहाणारे आहे,तसेच फाॅरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि,(FDCM Ltd,) मधील १ हजार ३५१ पदाच्या सुधारीत आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशांकाच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता देण्यात आली आहे, रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच पदांना मान्यता,या.शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकां-यासाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे,