Home कृषी पुण्यात शहर व जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ

    पुण्यात शहर व जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा धुमाकूळ

    98
    0

    पुणे २७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पावसाची अपडेट पुणे येथून आली आहे, दरम्यान मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे,आज देखील अवकाळी पाऊस पुणे शहर व जिल्ह्यात सुरू होता, पुणे शहरात आज सकाळपासून पाऊस पडत होता, तसेच कड नगर व उंड्री पिसोळी भागात देखील पाऊस कोसळत होता, दरम्यान या परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते, त्यामुळे वाहन चालकांना चांगलाच त्रास झाला आहे,प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे,तर कुणाच्या घरात तर कुणाच्या पावसाचं पाणी घुसले होते, त्यामुळे नागरिकांना घरातील व दुकानातून पाणी काढतांना चांगलीच कसरत करावी लागत होती, पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळित झाले होते, मागणी ३ ते ४ दिवसांपासून पुण्यात पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज पुढील ३ ते ४ तासांमध्ये जिल्हा मध्ये काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वा-यासह व विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे,तरी नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे व सतर्क राहावे अशी अपडेट मंत्रालयाच्या वतीने मोबाईल देण्यात येत आहे,

    Previous articleपावसाने शेतकऱ्यांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    Next articleदस्तास लागणारी नोंदणी फी माफ,१ हजार ३५१ पदाच्या सुधारीत आकृतीबंधास मंजुरी,६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर आजच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात आले निर्णय

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here