-
पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मणिपूर येथून आली असून,आज मध्यरात्री १.५४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत, दरम्यान राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्रानुसार हा भूकंप ५.२ तीव्रतेचा होता, तर या भूकंपाची जमिनीखाली खोली ४० किलो मीटर पर्यंत होती,या भूकंपामध्ये सुदैवाने कोणतीही प्रकरची जीवीतहानी व वित्तहानी झाल्याचे अद्याप वृत्त समोर आले नाही,मणिपूर सह मेघालयातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.