पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तरप्रदेश येथून आली आहे, उत्तरप्रदेश येथील लखनऊमधील ऐशबाग जंक्शन (ASH) येथे एक रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले आहे, दरम्यान या घटनेबाबत रेल्वेच्या सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार वायरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सदरची घटना घडली आहे, दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, सध्या रेल्वे वाहतूक प्रभावित झाली असून काही गाड्या मध्ये विलंब होण्याची शक्यता आहे,