पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे, पुण्यातील नवी पेठ पत्रकार भवन समोर पुणे महापालिकेची रस्ता दुरुस्तीची व्हॅन ही तेथे महानगरपहापालिकेचे काम ठेकेदार यांच्या मार्फत केले जात आहे, दरम्यान मागील ३ ते ४ दिवसांपासून पुण्यात पाऊस कोसळत आहे, दरम्यान या ठिकाणी काम अपूर्ण असल्याने या भागातील नागरिकांना याचा त्रास होत आहे, तरी पुणे महापालिकेच्या पथविभागाकडून दुर्लक्ष केले जाते, दरम्यान या ठिकाणी पत्रकार भवन आहे तसेच या खराब रस्त्यांवरुन पत्रकारांना ये जा करावी लागते, दरम्यान आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे खड्डे व दुरुस्तीची व्हॅन या रोडवरील खड्ड्यात रुतली आहे, आता तरी पुणे महापालिकेचे पथविभागाकडून रस्त्याचे काम व डांबरीकरण होणार का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे,