पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या युवा नेत्यांने २० मे वारजे येथील गणपतीचा माळ येथे बनावट गोळीबाराचे प्रकरण स्वतःने रचले होते, मला धमकीचा फोन आला व माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला असे पुणे वारजे पोलिसांना सांगितले, दरम्यान वारजे पोलिसांनी 👮 आता शिवसेना युवा नेता निलेश घारे याच्या मुसक्या आवळल्या आहेत,
दरम्यान सदर घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० मे रोजी निलेश घारे यांने त्याच्या कारवर गोळीबार झाल्याचा कट स्वतः नेच रचला होता,व अज्ञात व्यक्तीने आपल्याला धमकी देऊन गाडीवर गोळीबार केला असे पोलिसांना सांगितले, दरम्यान या नंतर पोलिसांनी तपास केला असता घारे याच्यावर गोळीबाराचा बेबनाव असल्याचे समोर आला , निलेश घारेवर त्याच्या जवळच्या समर्थकांनी सदरचा गोळीबार केला होता,यात तीन जणांचा समावेश होता व ते घारे याच्याच जवळचे लोक होते,अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजत आहे, दरम्यान या बनावट गोळीबाराचा देखावा करुन त्याला पोलिस संरक्षण पाहिजे होते, त्या साठी त्यांने या गोळीबाराचा बनाव आपल्या समर्थकांमार्फत रचला होता,असे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे, त्यानंतर वारजे पोलिसांनी 👮 आज बुधवारी रात्री उशिरा घारे याला अटक केली आहे.त्याला उद्या पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे,