पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईवरून आली आहे, दरम्यान मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे, मुंबईत नाले सफाईचे काम महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले नाही, तसेच महायुती सरकारने मेट्रोचे काम अपूर्ण असताना श्रेयाच्या लढाईत व महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन केले, परिणामी मेट्रो स्टेशनवर पाणीच पाणी झाले, तसेच मुंबईतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले,व कामाची पोलखोल उघड झाली, नागरिकांच्या घरात पाणी घुसले, त्यांचा संसार उघड्यावर पडला तर दुसरीकडे महायुती व विरोधकांची एकमेकांवर भर पावसाळ्यात चिखलफेक सुरू झाली आहे,हे सर्व होत असताना पावसामुळे मुंबईतील आयआयटी पवई येथील परिसरात मगर मुक्तपणे संचार करताना आढळली आहे, या घटनेने या परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान काही वेळाने ही मगर पुन्हा तलावात निघून गेली आहे,असे प्रत्यक्षदर्शींने सांगितले आहे,