पुणे २८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनवरवर प्रबंधकाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी शिवसेना उध्वव ठाकरे गटाच्या वतीने रेल्वे प्रशासनाने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे, दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी तसेच सुरक्षेसाठी आलेल्या निधीचा एक रुपया देखील वापरला नाही,असा देखील आरोप यावेळी करण्यात आला आहे, दरम्यान शिवसैनिकांनी यावेळी निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे प्रबंधक यांनी शिवसैनिकांना कार्यालयात येऊन दिले नाही, याठिकाणी रेल्वे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, दरम्यान शिवसैनिक हे निवेदन देण्यासाठी ठाम भूमिका घेतली व प्रबांधकांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवल्या नंतर प्रबंधक हे निवेदन घेण्यासाठी पोलिस बंदोबस्त कार्यालयाच्या बाहेर येऊन शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारले आहे,