पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्म दिवस आज शनिवारी त्यांची ३०० वी जयंती आहे, दरम्यान अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ या वर्षी जामखेड येथे झाला आहे, लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी पती , मुलगा व सासरे यांना गमावले तरीही देखील, त्यांनी मोठ्या धौर्याने हाती तलवार घेतली व प्रचंड अशा संघर्षावर मात केली, या त्यांच्या कालखंडात त्यांनी अनेक मंदिरे,घाट, बांधले, तसेच महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की, प्रत्येकाचं रक्त सळसळतेच ,याच इतिहासाच्या पानांत अहिल्याबाई होळकर यांच्या शौर्याचे सोनेरी पानही आहे,आज चौंडी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाणार आहेत.