पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच कृषी क्षेत्रातील खळबळजनक अपडेट हाती आली असून, कृषीमंत्री माणिक राव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, त्यांनी आता असं म्हटलं आहे की, कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी च आहे आणि मला हे खाते दिलं आहे,सदरचे विधान त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये बोलत असताना केले आहे, तसेच यापूर्वी देखील या महाशयांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? तसेच ढेकाळांचे पंचनामे करायचे का? असे विधान केले होते, दरम्यान कृषिमंत्री कोकाटेंनी पुन्हा असे विधान करून अकलेचे तारे तोडले आहेत, दरम्यान त्यांच्या आजच्या या विधानामुळे शेतकरी व शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत,
दरम्यान कृषी खातं ही ओसाड गावाची पाटीलकी आहे,असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटल्यांने जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तसेच इच्छा नसतानाही त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये, तसेच महायुती सरकारने देखील त्यांना मंत्रीपदावरुन तातडीने दूर करावे, कृषीमंत्री पदाच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी सेवा करण्याची संधी कार्यक्षम आणि संवेदनशील व्यक्तीकडे सोपवावी,असे जेष्ठ नेते शरद पवार गटाचे जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे,