पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) निलेश चव्हाण यांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी 👮 नेपाळच्या सीमेवरून मुसक्या आवळून त्याला विमानाने पहाटे २.३० वाजता आणण्यात आले,व त्याची लगेच थेरगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून त्याचा ताबा पहाटे ४ वाजता बावधन पोलिस यांच्याकडे दिला होता, आता थोड्याच वेळा पुर्वी बावधन पोलिस हे निलेश चव्हाण याला घेऊन पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयाकडे रवाना झाले आहेत.त्याला आज जिल्हा न्यायाधीश यांच्या सत्र न्यायालयात हजर सकाळीच करणार आहे.दरम्यान चव्हाण यांच्यावर वैष्णवी हगवणे हिच्या छोट्या बाळाची हेळसांड करणे तसेच कस्पटे कुटुंब हे चव्हाण यांच्याकडे बाळ मागण्यांसाठी गेले असता त्यांना रिव्हालवरचा धाक दाखवून धमकवल्याच्या आरोप आहे.बावधान पोलिस आज न्यायालयात त्याची पोलिस कोठडी मागणार असल्याचे समजते आहे,