पिंपरी -चिंचवड ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पिंपरी चिंचवड येथून आली आहे, निलेश चव्हाण हा मागील १० दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मागील १० दिवसांपासून फरार झाला होता,त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ४ टीमने नेपाळमधील काठमांडू येथे मुसक्या आवळल्या आहेत,त्याला आज विमानाने आज शनिवारी पहाटे २.३० वाजता पिंपरी चिंचवड येथे आणले आहे.
दरम्यान निलेश चव्हाण यांने वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड केली आहे , तसेच कस्पटे यांना रिव्हालवरचा धाक दाखवून धमकवल्याच्या आरोप कस्पटे यांनी यांनी केला आहे, दरम्यान गुन्हा दाखल होताच तो पुण्यात फरार झाला होता, त्याच्या मागावर पुणे पोलिसांच्या ३ टीम तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ४ टीम होत्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काठमांडू येथून मुसक्या आवळून त्याला आज २.३० वाजता पहाटे विमानाने पिंपरी चिंचवड येथे आणले.व त्याची थेरगाव येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे,व त्याला आज बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.त्याला आज बावधन पोलिस पिंपरी चिंचवड येथील न्यायालयात हजर करणार आहे,