पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) निलेश चव्हाण याला पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयाने ३ दिवासांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, फरार निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून मुसक्या आवळल्या आहेत, वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी व कस्पटे यांना रिव्हालवरचा धाक दाखवून धमकवल्याच्या देखील आरोप आहे, दरम्यान २१ जानेवारी पासून तो फरार होता.पोलिस यांच्या वतीने न्यायालयात दावा करण्यात आला आहे की,लता हगवणे तसेच नणंद करिष्मा हगवणे यांचा मोबाईल निलेश चव्हाण यांच्याकडे आहे.तसेच त्यांने रिव्हालवरचा धाक कस्पटे कुटुंबांना दाखवलं आहे, तसेच त्यांच्या रिव्हालवरचा परवाना पोलिसांनी 👮 रद्द केला आहे, तसेच त्यांच्याकडून मोबाईल फोन व रिव्हालवर जप्त करावयाचे आहे,असे सांगून पोलिस कस्टडी मागितली होती.त्यावर न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे ,