पुणे ३१ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक आषाढी वारी संदर्भात चिंता करणारी अपडेट आली आहे, महाराष्ट्रात कोरोनाचे आतापर्यंत एकूण ७ रुग्णांचा बळी गेला आहे,तर मागच्या प्रमाणे आता देखील ऐन आषाढी वारीच्याच दरम्यान कोरोनाचा संकट उद्भवले आहे,आता यातच एक खळबळजनक वृत्त आहे की सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातच कोविडचे दोन पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आता वारकरी यांच्या बरोबर प्रशासनाच्या देखील चिंता वाढलेली आहे, कारण अखंड भारत देशातून लाखोंच्या संख्येने वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी मजल दर मजल करत येत असतात,त्यात आता कोरोनाने सोलापूर जिल्ह्यातच एन्ट्री घेतल्याने राज्य सरकार व प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लाखो वारकरी यांचे लक्ष लागले आहे,