पुणे २ जुन (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली आहे, महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या घटनेत दिवसा दिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे.व अनेकजणांची फसवणूक झाली आहे,अशीच घटना बीड जिल्ह्यात घडली आहे, बीड मधील एका निवृत्त शिक्षकेला डिजिटल अरेस्ट करुन तिला लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे, दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २० मे रोजी एका निवृत्त शिक्षकेला अनोळखी नंबरवरुन काॅल आला,मी महाराष्ट्र पोलिस संजय पिसे बोलत आहे, तुमच्या नावे मनी लाॅड्रिंगच व अतिरेक्यांना फंडिग झाल्याची माहिती आहे, असे म्हणत २१ मे २९ मे या कालावधीत तिच्या कडून ८३ लाख १ हजार ८१६ रुपये हडपले आहेत,