पुणे ३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक क्रिकेट 🏏 आयपीएल बाबतची अपडेट हाती आली आहे,आज होणा-या आयपीएल फायनल सामना सुरू होण्या साठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, आजचा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे,सदरचा सामना आरसीबी विरुद्ध पंजाब यांच्यात होत आहे,याआधी हे दोन्ही संघ आतापर्यंत ३६ वेळा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत,यातील १८-१८ सामन्यात दोन्ही संघात विजय मिळवला आहे,तर चालू हंगामात दोन्ही संघामध्ये ३ सामने खेळले गेले असून यात आरसीबीने २ तर पंजाबने १ सामना जिंकला आहे,
दरम्यान आजच्या सामन्यात आरसीबी व पंजाब किंग्स यांच्यात आज अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर फायनल सामना खेळला जाणार आहे, या सामन्याच्या दरम्यान सायंकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे, मैदानावर ढग असतील तर बरोबर ७.३० वाजता सामना सुरू होताना पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे पाऊस झाला तर तो लवकरच संपेल व पुन्हा सामना सुरू होईल,तर सामना सुरू असताना तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे,