पुणे ३ जुन (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आयपीएल फायनल सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम 🎳 गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे,तर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे, दरम्यान दुसऱ्या क्वाॅलिफायर सामान्यात मुंबई इंडियन्स चा पराभव करून पंजाब किंग्सने फायनल मध्ये धडक मारली आहे, दरम्यान आजच्या फायनल सामन्यात कोणता संघ जिंकला तरी इतिहास घडणार आहे, तसेच आज नवीन विजेता मिळणार आहे, बरोबर साडेसात वाजता हा आयपीएल फायनल सामन्याचा थरार अहमदाबाद स्टेडियमवर रंगणार आहे.