पुणे ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक डिजिटल मिडियाच्या संदर्भात अपडेट आली असून, राज्य सरकार च्या वतीने आज महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया मधील काम करणाऱ्या संपादक व पत्रकारांसाठी आनंदाची न्यूज आहे, दरम्यान राज्यातील सर्व डिजिटल मीडिया मधील चॅनल्स आणि वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देउन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक आज मंगळवारी ३ जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे,
दरम्यान वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना याबाबत मागील सहा वर्षांपासून या मागणीसाठी राज्य सरकारकडे अथक प्रयत्न करत होती, दरम्यान महाराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यात तसेच ग्रामीण भागात व मेट्रो सिटीपर्यत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मिडियामधील संपादक व पत्रकारांना याचा लाभ होणार आहे, दरम्यान डिजिटल मिडिया संपादक व पत्रकार संघटनेचे भिलार महाबळेश्वर आणि कनेरी मठ येथे झालेल्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार , उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांनी या बाबत संघटनेला आश्र्वासन दिले होते, दरम्यान आज या आश्र्वासनाची पुर्ती झाली आहे.त्या मुळे महायुती सरकार मधील सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे, दरम्यान डिजिटल मिडिया मधील संपादक व पत्रकार या संघटनेचे एकूण देश भरातील १२ हजार पेक्षा अधिक डिजिटल मिडिया मधील संपादक व पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत,सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मिडियाला राजमाता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर आज यश मिळाले आहे, दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ आता मिळणार आहे, संघटनेने केलेल्या योग्य पाठ पुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे, सदरचा निर्णय हा महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे एक क्रांतिकाराक निर्णय आहे,