पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरू येथील एम.चेन्नस्वामी स्टेडियम येथे आरसीबीच्या विजयी मिरवणूकी मध्ये सहभागी झालेल्या ११ जणांचा चेंगराचेंगरी मृत्यू झाला होता,तर एकूण ३३ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत, दरम्यान या दुर्दैवी घटनेने आरसीबी कुटुंबाला खूप वेदना झाल्या आहेत, दरम्यान आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून म्हणून आरसीबीने मृतांच्या एकूण ११ कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तसेच याशिवाय या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार केला जात आहे,असे आरसीबीने ट्विट करत सांगितले आहे, दरम्यान आरसीबीच्या विजयानंतर ही दुर्दैवाची घटना घडली आहे,