पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली असून चर्चगेट रेल्वे स्टेशनवर एका दुकानाला भीषण अशी आग लागली आहे, दरम्यान सध्या या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी झाल्या आहेत, दरम्यान आगीच्या घटनेनंतर या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे, तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, घटनास्थळी रेल्वेचे पोलिस देखील दाखल झाले आहेत, दरम्यान ही दुकानाला आग 🔥 नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, दरम्यान या घटनेत प्रथमदर्शनी आलेल्या अपडेट नुसार कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही,