पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून, उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे, दरम्यान या बाबत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल,असे म्हटले होते,त्यानंतर आता याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारण्यात आली असता,त्यावर त्यांनी थेट माध्यामासमोर थेट हात जोडले,त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या प्रतिक्रियेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे,आमची महायुती मजबुतीने महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका लढणार व जिंकणार,असे उत्तर शिंदे यांनी दिले आहे,