पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कर्नाटक राज्यातून बंगळुरू येथून आली आहे, दरम्यान कर्नाटक सरकारने बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिस आयुक्तांसह आठ अधिका-यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे, त्यानंतर आज शुक्रवारी सकाळीच बंगळुरू विमानतळावरुन आरसीबी व्यवस्थापन कर्मचारी निखिल सोसले व डीएनए व्यवस्थापन कर्मचारी सुनील मॅथ्यू यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे,यात अटक करण्यात आलेल्याची नावे किरण व सुमंत अशी आहे, आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आले आहे, तर यात आणखी कर्मचारी यांना देखील अटक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,