पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथून आली आहे, सामाजिक कार्यकर्ते एच.एम.वेंकटेश यांनी बंगळुरू येथील क्यूबन पार्क पोलिस स्टेशन मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, दरम्यान सदर प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारी आधीच नोंदवलेला गुन्हा मानला जाईल आणि चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर चालू तपासादरम्यान त्याची चौकशी केली जाईल, दरम्यान मंगळवारी ३ जून रोजी पंजाब विरुद्ध आरसीबी फायनलचा सामना जिंकल्यावर बंगळुरू येथे झालेल्या सेलिब्रेशन दरम्यान अनेक क्रिकेट 🏏 चाहत्यांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे,तर अनेकजण हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान विराट कोहलीच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे,