पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रच सज्ज झाला आहे, रायगड किल्ल्या ही उत्साहाच्या रंगात अन् विविध फुलांच्या सजावटीने सजला आहे,आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा शिवराज्या भिषेक सोहळा पार पडणार आहे, शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमींनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे, दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,
६ जून हा सुवर्ण दिवस आज प्रत्येकांसाठी खास आहे,याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता, जेष्ठ शुध्द त्रयोदशी १६७४ रोजी विधीपूर्वक राज्यभिषेक होऊन शिवराय हे ‘छत्रपती ‘ झाले होते,प्रजेवर जिवापाड प्रेम करणारे, महिलांच्या सन्मानासाठी लढणारे, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारे असं होते आपला शिवबा.महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त सर्वांना मराठी डिजिटल इ पेपर पोलखोलनामाच्या वतीने शुभेच्छा,