पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून, उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या चांगलाच जोर आला आहे, दरम्यान आज शुक्रवारी अशातच आता यावर उध्दव ठाकरेंनी सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल,आता संकेत देणार नाही, थोड्याच दिवसात बातमीच देतो,असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे, तसेच आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही,असे देखील त्यांनी म्हटले आहे,