पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पाकिस्तानमधून आली असून, लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तसेच भारतातील अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंड हफीज सईद हा पाकिस्तान मध्येच असून तो पाकिस्तानच्या लष्कराच्या सुरक्षेत विश्रांती घेत आहे,असा दावा माध्यमांना दिलेल्या मुलाखती मध्ये हाफीज याचा मुलगा तल्हा सईदनेच केला आहे, तसेच पाकिस्तानची देखील पोलखोल केली आहे,
दरम्यान जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये भारतीय पर्यटक यांच्यावर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने’ऑपरेशन सिंदूर’या मोहिमेच्या अंतर्गत पाकिस्तान येथे लपलेल्या दहशतवादी यांच्या तळावर हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहे,त्यातच लष्कर – ए – तोयबाचा देखील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे, या नंतर आता हाफीज सईद याचा मुलगा तल्हा सईदने एका एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना म्हटले आहे की, हाफीज सईद हा पाकिस्तान मध्ये पाकिस्तानच्या लष्कराच्या सुरक्षेत विश्रांती घेत आहे, तसेच पाकिस्तान सरकार व पाकिस्तानी लष्कर हे दहशतवादी हाफीज सईद याचा ताबा भारताकडे कधी सुपूर्द करणार नाहीत,व तसा मुर्खपणा देखील करणार नाही,असे म्हणत पाकिस्तान सरकारची व लष्कराची पोलखोल केली आहे,