पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशिन खरेदी करण्यात आल्या होत्या, दरम्यान या प्रकल्पासाठी एकूण १८ कंत्राटदार यांना १ हजार १०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते,मात्र या व्यवहारात तब्बल ६५ कोटी ५४ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप,यात १३ जणांना आरोपी करण्यात आले,बीएमसीचे अधिकारी व बाॅलिवूड स्टार्सचाही या घोटाळ्यात समावेश असल्याची माहिती आहे,
दरम्यान मुंबई मिठी नदीचा घोटाळा प्रकरणी आज ED ने बाॅलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या घरी धाड टाकली आहे,’व्हिला मोरिया’ या निवासस्थानासह मुंबई व कोची येथील एकूण १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे,या छापेमारी दरम्यान ED ने त्यांची आर्थिक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक डेटा व व्यवाहाराची नोंद तपासली, दरम्यान डिनो मोरियाचा भाऊ सांतिनो यांच्या कंपनीला या घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदमकडून १८ लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे,