पुणे ६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे,RCB च्या विजया नंतर पुण्यात हुल्लडबाजी करणा-या चाहत्या वर आता डेक्कन पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आला आहे, दरम्यान मंगळवारी ३ जून रोजी आरसीबी व पंजाब यांच्यात फायनल सामना अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर झाला,यात पंजाबला पराभूत करत आरसीबी ने हा सामना तब्बल १८ वर्षाने जिंकला होता, सदर सामन्यानंतर पुण्यातील डेक्कन मधील गुडलक चौकात मोठ्या संख्येने आरसीबीचे चाहते जमा झाले होते व त्यांनी गोंधळ घातला होता,या प्रकरणी आता डेक्कन 👮 पोलिसांनी एकूण ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान या चौकातील सीसीटीव्ही तपासून आणखी काही चाहत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे,अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे, दरम्यान यातील चाहत्यांनी नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी फटाके 🎆 फोडून मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी केली आहे, या प्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत,