पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील नाना पेठ मासे विक्री दुकानदाराला खंडणीची मागणी करुन मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवम आंदेकरसह एकूण ६ जणांच्यावर फरासखाना पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी पोलिसांनी शिवमला अटक केली आहे,तर त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत,
दरम्यान सदर घटनेबाबत पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार नाना पेठेतील ३८ वर्षीय मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीका ने फरासखाना पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे, दरम्यान तुझे दुकान अनधिकृत आहे.असा दावा करुन आंदेकर व त्यांच्या इतर साथीदारांनी दर महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली, दरम्यान मागील ३ ते ४ महिन्यांपासून त्याच्याकडे पैसे मागितले जात होते, तसेच पैसे न दिल्यास मारण्याची धमकी देखील दिली होती, याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे, या प्रकरणी पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत,