पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बकरी ईद आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशभरातील मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा तथा ‘बकरीईद’च्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत,त्याग , श्रध्दा आणि समर्पण या उद्दात मूल्यांची शिकवण देणारा ‘ईद-उल-अजहा ‘ चा सण समाजात शांतता,बंधुता, आणि सौहार्द वाढवणारा आहे, या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख,समृध्दी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो,हीच सदिच्छा व्यक्त करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.