पुणे ७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातूनच आली आहे, पुण्यातील शिवाजी नगर येथील पोलिसांच्या इमारतीत राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.सदर घटनेने पोलिस वसाहत मध्ये एकच खळबळ उडाली आहे, दरम्यान आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचारी यांचे नाव सचिन सुर्वे (वय ४६ रा.पोलिस वसाहत शिवाजीनगर पुणे) असे आहे, दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांनी दिली की सुर्वे हे पुण्यातील खडक पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते,त्यांची पत्नी व मुलगी गावाला गेले होते ते घरात एकटेच असताना त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरम्यान आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळाली नाही, दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहे,